नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

By admin | Published: November 14, 2016 01:31 AM2016-11-14T01:31:53+5:302016-11-14T01:31:00+5:30

महापालिका : मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा; पहिल्या टप्प्यात ५० घंटागाड्या रस्त्यावर

Launch of New Ghumagad | नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

Next

नाशिक : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते नवीन घंटागाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात ५० घंटागाड्या रस्त्यावर उतरल्या.
गोल्फ क्लब मैदानावर आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, मनसेचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व शहराध्यक्ष राहुल ढिकले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, मनसेचे गटनेते अनिल मटाले, भाजपा गटनेते सतीश कुलकर्णी, रिपाइंचे गटनेते प्रकाश लोंढे, नगरसेवक यशवंत निकुळे, कांचन पाटील आदि उपस्थित होते. यावेळी विनायकदादा पाटील यांनी सांगितले, नाशिक शहराला निसर्गाची उत्तम देणगी लाभलेली आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य जपण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून ती सर्व नागरिकांची आहे. नागरिकांनी शहराचे विद्रुपीकरण होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. नवीन घंटागाड्यांमार्फत शहराच्या स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही शहर स्वच्छतेत नागरिकांचेही मोठे सहकार्य अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले, तर अविनाश अभ्यंकर यांनी मनसेच्या कामांची चुणूक आता दिसायला लागत असल्याचे सांगितले. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावणार असल्याबाबत आनंद व्यक्त करतानाच ठेकेदार व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीचे भान राखावे, असे आवाहन केले. प्रारंभी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, सहायक आरोग्याधिकारी सचिन हिरे, डॉ. सुनील बुकाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of New Ghumagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.