पोषण आहार अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:58 PM2019-09-10T12:58:09+5:302019-09-10T12:58:22+5:30
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बालकल्याण विभागाच्यावतीने पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून लोहशिंगवे येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बालकल्याण विभागाच्यावतीने पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून लोहशिंगवे येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला. ग्रामस्थांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.या अभियानाअंतर्गत बालकांच्या पोषण आहार आणि आरोग्याच्या दृष्टीने महिनाभर विविध कार्यक्र म राबविले जाणार आहे.या अभियानाचा शुभारंभ सरपंच संतोष जुंद्रे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या अभियानाअंतर्गत बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बालकांचे पहिल्या एक हजार दिवसांमध्ये अॅनेमिया, अतिसार, हात धुणे, स्वच्छता, पौष्टिक आहार, पाणी, परिसर वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत महिनाभर विविध उपक्र म राबवले जाणार आहे.अंगणवाडी केंद्राबरोबरच बालकांच्या प्रत्यक्ष घरी भेट देऊन याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच प्रभातफेरी, आरोग्य शिबिरे, सायकल रॅली, वादविवाद स्पर्धा, पोषण आहारावर आधारीत प्रश्नमंजुषा आदी
कार्यक्र म महिनाभर चालणाऱ्या या पोषण अभियानाअंतर्गत घेतले जाणार असल्याची माहिती अंगणवाडी सेविका जाधव यांनी दिली.पोषण आहार या उपक्र मामध्ये पालकांचाही सहभाग असणार आहे.त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी शाळांवर आधारित पालक मेळावे घेण्यात येणार आहे.तसेच अंगणवाड्यांमध्येही हे मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. १४ ते २१ सप्टेंबर दरम्यान हे कार्यक्र म राबवले जाणार आहे. २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान बचतगटांच्या बैठका घेऊन आजार, स्वच्छतांबाबत चर्चा केली जाणार आहे असे यावेळी जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी सुरेखा पाटोळे, जयश्री गंधे, सोनाली पाटोळे, श्रीमती जाधव, माजी उपसरपंच शिवाजी डांगे, ज्ञानेश्वर जैन, रतन पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.