पिंपळगावी टोमॅटो लिलावाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:43 AM2017-08-18T00:43:10+5:302017-08-18T00:43:49+5:30

सायखेडा : जिल्ह्यातील टोमॅटो विक्र ीसाठी अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीत टोमॅटो विक्र ीचा शुभारंभ सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी नऊ हजार क्रेटची आवक झाली. टोमॅटोला अकराशे रुपये भाव मिळाला.

 Launch of Pimpalgaon Tomato auction | पिंपळगावी टोमॅटो लिलावाचा शुभारंभ

पिंपळगावी टोमॅटो लिलावाचा शुभारंभ

Next

सायखेडा : जिल्ह्यातील टोमॅटो विक्र ीसाठी अग्रेसर असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीत टोमॅटो विक्र ीचा शुभारंभ सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी नऊ हजार क्रेटची आवक झाली. टोमॅटोला अकराशे रुपये भाव मिळाला. सलग दोन वर्षे टोमॅटो कवडीमोल भावात शेतकºयांना विकावा लागला होता. शेतकºयांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नव्हता. त्यामुळे यंदा भाव मिळणार नाही अशी शक्यता असल्याने अनेक शेतकºयांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली. मात्र दोन महिन्यांपासून विक्र मी भावाने टोमॅटो विकला जात आहे. येथून बांगलादेश, पाकिस्तान, पश्चिम बंगाल, नेपाळ देशात टोमॅटो निर्यात होते. यावेळी संचालक विजय कारे, सोहनलाल भंडारी, रामभाऊ माळोदे, गोकुळ गिते, शरद काळे, सुरेश खोडे, शंकरलाल ठक्कर, नेताजी बनकर आदी उपस्थित होते.

Web Title:  Launch of Pimpalgaon Tomato auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.