प्लास्टीक बाटली क्रशींग मशिनचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 06:25 PM2019-10-01T18:25:18+5:302019-10-01T18:25:41+5:30
येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीचे सदस्य नितीन पांडे, भुसावळ रेल्वे समितीचे सदस्य कांतीलाल लुणावत यांच्या हस्ते करण्यात आला.
मनमाड : येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीचे सदस्य नितीन पांडे, भुसावळ रेल्वे समितीचे सदस्य कांतीलाल लुणावत यांच्या हस्ते करण्यात आला.
या मशिनमध्ये फक्त प्लास्टिक बॉटल टाकता येणार आहे. त्या बाटलीचे झाकण टाकता येणार नाही. तसेच प्लास्टिक व्यतिरीक्त जे साहित्य आहे ते देखील त्यात टाकता येणार नाही. रेल्वे प्रवाशांनी स्थानकात स्वच्छता ठेवत पाण्याच्या बाटल्या या मशिनमध्ये नष्ट करावयाच्या आहेत . या मशिनवर इंग्रजी सूचना आहेत. त्या सर्वसामान्य प्रवाशांना कळणार नाही म्हणून याठिकाणी रेल्वे प्रशासनाने या मशिन वापराच्या माहितीचा डिजीटल सूचना फलक मराठी व हिंदी भाषेमध्ये त्या मशिनजवळ लावावा तसेच अशा पध्दतीची बाटली क्रशिंग मशीन सर्वच फलाटावर बसवावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाला करणार असल्याचे याप्रसंगी नितीन पांडे यांनी सांगितले.
प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिनमध्ये जमा होणाऱ्या प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट रेल्वे प्रशासन लावणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होण्यास मदत होणार आहे.
या वेळी भाजप नाशिक जिल्हा चिटणीस नारायण पवार, भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन दराडे, नितीन परदेशी, संदिप नरवडे, बुढनबाबा शेख, आशिष चावरीया , सचिन जाधव, नारायण जगताप, बिट्टू कसबे, बाळा गांगुर्डे आदी उपस्थित होते.