सटाण्यात प्रधानमंत्री पीकविमा सुविधा केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:17+5:302021-08-20T04:18:17+5:30

पीकविम्याचा जास्तीतजास्त शेतक-यांना लाभ व्हावा व अर्ज भरणे सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात प्रधानमंत्री पीकविमा कंपनी सुविधा केंद्र ...

Launch of Prime Minister's Crop Insurance Facility Center in Satana | सटाण्यात प्रधानमंत्री पीकविमा सुविधा केंद्राचा शुभारंभ

सटाण्यात प्रधानमंत्री पीकविमा सुविधा केंद्राचा शुभारंभ

Next

पीकविम्याचा जास्तीतजास्त शेतक-यांना लाभ व्हावा व अर्ज भरणे सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात प्रधानमंत्री पीकविमा कंपनी सुविधा केंद्र सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार नामपूर रस्त्यावर सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्याच्या पूर्वहंगामी द्राक्षांसाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे व लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूमिका मांडल्याने द्राक्ष पिकासाठी गेल्या तीस वर्षांतील विम्याची मागणी शासनाने मान्य केल्याचे नमूद केले. पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पीकविमा कंपनीचे कार्यालय सुरू झाल्याची माहिती प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना व ग्रामपंचायतीला देण्याच्या सूचनादेखील केल्या.

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, विमा कंपनीचे अधिकारी शेख, स्वप्नील कापडणीस, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक देवरे, मंडळ कृषी अधिकारी नानाजी भोये, अमरचंद अडसूळ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयकीर्तिमान पाटील व आभारप्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी केले.

फोटो - १९ सटाणा १

सटाणा येथे प्रधानमंत्री पीकविमा कंपनी सुविधा केंद्राचा शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, माणिक देवरे, शेख आदी.

190821\19nsk_11_19082021_13.jpg

सटाणा येथे प्रधानमंत्री पीक विमा कंपनी सुविधा केंद्राचा शुभारंभ करतांना आमदार दिलीप बोरसे. समवेत तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, माणिक देवरे,  शेख आदी.

Web Title: Launch of Prime Minister's Crop Insurance Facility Center in Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.