मुग, उडिद सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:34 PM2018-10-29T17:34:15+5:302018-10-29T17:42:49+5:30
येवला : केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग, उडिद व सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ येवला तालुका खरेदी विक्र ी संघाच्या आवारात विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांचे हस्ते पार पडला.
येवला : केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग, उडिद व सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ येवला तालुका खरेदी विक्र ी संघाच्या आवारात विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांचे हस्ते पार पडला.
महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ अध्यक्ष उषाताई शिंदे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंबादास बनकर, माजी प. स. सभापती सभाजी पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हि. एस. इंगळे आदि उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोदंणी केली त्यांचा मुग रू. ६९७५ उडिद रू. ५६०० व सोयाबीन रू. ३३९९ रु पये प्रति क्विटल दराने खरेदी केला जाणार आहे. मकाची आॅनलाईन नोंदणी दि. १ नोव्हेंबर पासुन संघकार्यालयात सुरु होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी दिली. यावेळी नोदंणीसाठी मका पिकाची आॅनलाईन नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स या कागदपत्रा पुर्तता होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगीतले.
येवला तालुक्याची भयावह परिस्थीती लक्षात घेऊनच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय व्हावी, जनतेचा हाताला काम मिळावे आदि मागण्याचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना आपण दिल्याचे आमदार दराडे यांनी सांगीतले. विक्र ीसाठी आणलेला मालाची आद्रता १२ टक्के व काडी कचरा नसलेला स्वच्छ प्रतिचा स्र्नक्त दर्जाचाच माल शेतकरी बांधवानी खरेदी केंद्रावर विक्र ीसाठी आणावा असे आवाहन जिल्हा मार्केटिंग आधिकारी व्हि. एस. इंगळे व संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले. या शुभारंभास संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड, महाराष्ट्र राज्य कापुस महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर, माजी चेअरमन राजेंद्र गायकवाड, संचालक दामु पवार, दत्ता आहेर, जनार्दन खिल्लारे, शिवाजी धनगे, भास्कर येवले, दत्तात्रय वैद्य, नाना शेळके, दगडु टर्ले, जगन्नाथ बोराडे, प्रथम शेतकरी खंडू ढोकणे, अरुण काळे, वाल्मीक गोरे, जगन मुंढे, सर्जेराव सावंत, अॅड. बापु गायकवाड, रमेश वाघ, श्रीराम आव्हाड, हरिष मुंढे, रघुनाथ जमधडे आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.