लाल कांदा खरेदी विक्र ीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:36 PM2017-09-28T23:36:54+5:302017-09-29T00:09:40+5:30
दरवर्षीप्रमाणे येथील बाजार समितीत दसºयाच्या (विजयादशमी) मुहूर्तावर शनिवारी (दि. ३०) रोजी नवीन लाल (पावसाळी) कांदा खरेदी- विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.
उमराणे : दरवर्षीप्रमाणे येथील बाजार समितीत दसºयाच्या (विजयादशमी) मुहूर्तावर शनिवारी (दि. ३०) रोजी नवीन लाल (पावसाळी) कांदा खरेदी- विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.
दरवर्षी लाल (पावसाळी) काद्यांची आवक विजयादशमीनंतर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याआधी दसºयाच्या मुहूर्तावर बाजार समितीतर्फे लाल कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात येतो. त्या अनुषंगाने विजयादशमीच्या मुहूर्तावर जवळजवळ सर्वच व्यापारी बांधव नवीन कांदामाल खरेदी करु न नवीन व्यापारास सुरु वात करतात व शेतकरीबांधवही नवीन माल विक्रीचा शुभारंभ करतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त नवीन लाल कांदा माल प्रतवारी करून विक्र ीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांनी केले आहे. दरम्यान मागील वर्षी दसºयाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात लाल कांदा विक्र ीस आला होता. यावर्षी परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने किती माल विक्रीस येतो व काय भाव निघतो याबाबत शेतकºयांना उत्सुकता लागून आहे.