दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:56 PM2017-12-11T13:56:06+5:302017-12-11T13:59:17+5:30

Launch of the runner-up route of the tenth state-level Nashik MVP marathon tournament | दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ

दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ

Next
ठळक मुद्दे०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडु प्रमुख पाहुणे मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अ‍ॅप तयार

नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मविप्र संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने मविप्र मॅरेथान स्पर्धा ९ वर्षापुर्वी सुरु झाली . ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून सुरु होऊन धोंडेगावपर्यंत व परत मॅरेथान चौक असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे .
जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना २०१८ हे वर्ष केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षवर्धन राठोड यांनी क्रीडा वर्ष म्हणुन घोषित केले असुन मविप्र मॅरेथान स्पर्धेने नाशिकच्या २०१८ क्रीडा उपक्रमांची ची दमदार सुरुवात होणार असुन शासनाच्या वतीने मविप्र मॅरेथान स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगुन नशिक मविप्र मॅरेथान स्पर्धा देशात नाशिक शहराची एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे ,संस्था गेल्या ०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत असून जास्तीत जास्त नाशिककरांनी मॅरेथान स्पर्धेत सहभागी व्हावे असे, आवाहन रविंद्र नाईक यांनी केले .


मविप्र मॅरेथान धावनमार्ग हा भारतातील धावपटूसाठी आरोग्यदायी व सुखकर असून गेल्या ९ वर्षातील स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडु प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असुन त्यामध्ये धनराज पिल्ले , काका पवार , पी टी उषा , कविता राऊत , सुशिलकुमार यादव , व्ही व्ही एस लक्ष्मण , गगन नारंग , नरसिंग यादव,अंजू बॉबी जॉर्ज यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे .

दहाव्या राज्यस्तरीय मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अ‍ॅप तयार करण्यात आले असुन अ‍ॅपचे उद्घाटन यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊनरजिस्ट्रेशन करता येईल  नाशिक जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षाआतील मुले व मुली यांचेसाठी ६ की मी अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे,तसेच ३५ वर्षापुढील महीलांची, ४५ , ६० आणि ७५ वर्षावरील पुरुष गटाच्या वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Web Title: Launch of the runner-up route of the tenth state-level Nashik MVP marathon tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.