गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:38 PM2019-02-05T18:38:19+5:302019-02-05T18:38:49+5:30
सिन्नर तालुक्यातील मोहू गावात महाराष्ट्र शासन व युवा मित्र संस्थेमार्फत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ सरपंच सुदाम बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहू गावात महाराष्ट्र शासन व युवा मित्र संस्थेमार्फत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ सरपंच सुदाम बोडके यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या मोहू गावात मंगळवारी महाराष्ट्र शासन व युवा मित्र संस्थेमार्फत मोह शिवारातील सर्वच बांधा-यामधील गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली. गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करावयाची आहे तसेच संस्थेकडून पोकलेन मशीन दिलेले आहेत व त्यासाठी लागणारे इंधन हे महाराष्ट्र शासन देणार आहे, बंधाऱ्यातील सुपीक माती लोक आपले ट्रॅक्टर किंवा हायवा लावून आपल्या शेतात टाकून आपल्या जमिनीचा पोत सुधारावा म्हणून प्रयत्न करीत आहे. बंधारा व नाल्यातील गाळ उपसा केल्यामुळे गावातील जलसाठ्यामध्ये वाढ होणार आहे, असे युवा मित्र संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर यांनी सांगितले. तसेच गाळाची वाहतूक करण्यासाठी आम्ही वाहनांची व्यवस्था करून बंधारा व नाल्यातील माती बाहेर काढण्यास तयार आहोत, असे जय बजरंग गाळ उपसा समितीचे अध्यक्ष निवृत्ती होलगीर यांनी सांगितले. यावेळी युवा मित्र संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, जिल्हा समन्वयक मंगेश बोपचे, अभियंता धनंजय देशमुख, संदीप ठुबे, तालुका समन्वयक प्रीतम लोणारे, वैभव आव्हाड यांच्यासोबत उपसरपंच शिलाबाई बिन्नर, साहेबराव बिन्नर, सोमनाथ बोडके, संदीप बोडके, संपत भिसे प्रकाश भिसे, बबन बोडके, बबन दराडे, नामदेव भिसे तसेच गाळ उपसा समिती सदस्य उपस्थित होते.