एकलहरे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:20 PM2019-12-12T13:20:11+5:302019-12-12T13:23:20+5:30
एकलहरे येथील दारणा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनचा शुभारंभ करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून खर्चास मंजुरी देण्यात आल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
नाशिक: एकलहरे येथील दारणा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनचा शुभारंभ करण्यात आला. एकलहरे गावातील राजवाडा, मारु ती मंदिर परिसर, इंदिरा नगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी दारणा नदीतील पाणी पुरवठा करण्यास १४ व्या वित्त आयोगातून खर्चास मंजुरी देण्यात आल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ज्येष्ठ नेते राजाराम धनवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच मोहिनी जाधव, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, एकलहरे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अशोक राजोळे, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य कांताबाई पगारे, निलेश धनवटे, विश्वनाथ होलिन, शोभा वैद्य, मुक्ता दुशिंग, शोभा म्हस्के, रत्न सोनवणे, सागर जाधव, सौरभ धनवटे आदी उपस्थित होते.