उमराणेत एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:32 PM2019-09-05T15:32:09+5:302019-09-05T15:32:19+5:30
उमराणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना आधार क्र मांकाशी जोडलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड योजनेचा गुरूवारी उमराणे येथे शुभारंभ करण्यात आला आहे.
उमराणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना आधार क्र मांकाशी जोडलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड योजनेचा गुरूवारी उमराणे येथे शुभारंभ करण्यात आला आहे. स्मार्ट कार्डमध्ये बस पासधारकाचे नाव, सवलतीचा आणि बसचा प्रकार, प्रवासाचे अंतर, प्रवास सवलतीची मुदत आदी माहितींचा समावेश आहे. हे कार्ड संबंधित सवलत धारकाच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे. या स्मार्ट कार्डचे वितरण सुरु करण्यात आल्याची माहिती परिवहन प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड नावनोंदणीनंतर १५ दिवसात नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड योजनेची नाव नोंदणी निवृत्ती काका देवरे संपर्क करण्यात आली असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, सुभाष कारभारी, केदा नामदेव, मोहन शंकर देवरे, ईश्वर देवरे, भारत देवरे, संजय देवरे ,राजाराम दौलत व इतर लाभार्थींनी पहिल्याच दिवशी कार्ड नोंदणी केली आहे. या कार्डावर संबंधित ज्येष्ठ नागरिकांचे छायाचित्र असणार असून त्या माध्यमातून एसटी ज्येष्ठांना नवीन ओळख देत आहे. प्रवास करताना या कार्डाशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे दाखविण्याची गरज त्यांना भासणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून या स्मार्ट कार्ड सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.