क्षयरोग उपचार पद्धतीचा शुभारंभ

By admin | Published: February 23, 2017 12:16 AM2017-02-23T00:16:44+5:302017-02-23T00:16:55+5:30

क्षयरोग उपचार पद्धतीचा शुभारंभ

Launch of TB treatment | क्षयरोग उपचार पद्धतीचा शुभारंभ

क्षयरोग उपचार पद्धतीचा शुभारंभ

Next

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग संपूर्ण नाहीसा करण्यासाठी आशा सेविकांनी घरोघरी क्षयरोग तपासणी आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.  जिल्हा शासकीय रुग्णालय येथे क्षयरोग दैनंदिन उपचार पद्धतीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रोगाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. या गंभीर आजाराच्या नियंत्रणात आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगले काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात येईल. औषधोपचारासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच सहा महिन्यांनंतर स्वत: या मोहिमेचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा क्षयरोगमुक्त आणि हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकात्रितपणे प्रयत्न करावे, असे आवाहन केले. संसर्गजन्य असलेल्या गंभीर क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका मिळून काम करतील, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते.

Web Title: Launch of TB treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.