संत निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जिर्णोद्धारास प्रारंभ, पहिल्या काळ्या पाषाणाची विधीवत पुजा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:28 PM2018-09-13T13:28:27+5:302018-09-13T13:29:14+5:30
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु झाले असून काळ्या पाषाणाची विधीपुर्वक पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु झाले असून काळ्या पाषाणाची विधीपुर्वक पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, मधुकर लांडे, संदीप शिंदे, व्यवस्थापक गंगाराम झोले, ठेकेदार श्रीहरी तिडके तर पुजारी सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ मंदीराचा संपुर्ण जीर्णोध्दार काळ्या पाषाणाने करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले होते. त्यानुसार संपुर्ण मंदीर काळ्या पाषाणाचे साकारणार आहे. वास्तुविशारद अमृता पवार यांनी निवृत्तीनाथ पाषाण देवालयाची वास्तु तयार केली आहे. या मंदिराचे ठेकेदार श्रीहरी तिडके आहेत. त्यांना देवालये बांधकाम करण्याचा चांगला अनुभव आहे. संत निवृत्तीनाथ देवालय बांधकाम सुरु करण्यापुर्वी सुमारे १५ फुट कमीत कमी खोल पाया आतापर्यंत भरला. तर सहा फुट रु ंदी ठेवण्यात आली आहे. तथापि मंदिराच्या खाली पायात देखील कमळाच्या आकाराची डिझाईन करण्यात येणार असल्याचे ठेकेदार तिडके यांनी सांगितले. जेणेकरु न कमळात मंदीर बसविले असल्याचे दिसले पाहिजे. आता प्रत्यक्ष बांधकाम सुरु करतांना मंदीराच्या पहिल्या पाषाणाची विधीवत पुजा करण्यात आली.