घटस्थापनेच्या मुहूर्तावर टमाटा लिलावाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:36 PM2018-10-12T17:36:05+5:302018-10-12T17:36:22+5:30

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावता माळीनगर) उपबाजार आवारात घटस्थापनेच्या मुहूर्तावर टमाटा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.

Launch of Tomato auction on the occasion of the establishment | घटस्थापनेच्या मुहूर्तावर टमाटा लिलावाचा शुभारंभ

घटस्थापनेच्या मुहूर्तावर टमाटा लिलावाचा शुभारंभ

Next

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावता माळीनगर) उपबाजार आवारात घटस्थापनेच्या मुहूर्तावर टमाटा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते लिलावास प्रारंभ करण्यात आला. बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, संचालक सोमनाथ भिसे, संजय खैरनार, दत्तात्रय वाजे, अशोक वाघ, विलास हारक, अंबादास भुजबळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी २५० वाहनांतून मोठ्या प्रमाणावर टमाटा विक्रीसाठी आणला होता. सुमारे ६ हजार जाळ्या एवढी टमाट्याची आवक झाली. रुपये ३०१ ते ३२१ प्रतिजाळी याप्रमाणे बाजारभाव राहिले. सदर बाजार आवार शेतकºयांसाठी आठवड्यातील संपूर्ण सात दिवस सुरू राहील. यापूर्वी परिसरातील शेतकºयांना टमाटा शेतमाल विक्रीसाठी समशेरपूर, नाशिक, पिंपळगाव येथे जावे लागत होते. बाजार समितीने पांढुर्ली उपबाजार येथे टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ केल्याने समितीच्या आवारात शेतकरी वर्गाने पांढुर्ली या बाजारपेठेस प्राधान्य दिले आहे. बाजार समितीनेही शेतकºयांना मूलभूत सुविधा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे सभापती विनायक तांबे यांनी सांगितले.
यावेळी खरेदीसाठी आर. के. बागवान, लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, प्रभाकर हारक, निवृत्ती चव्हाणके, बाळासाहेब दळवी, रईस पटेल, एफ. एम. ट्रेडर्स, शालिमार ट्रेडर्स, एस. एस. बागवान, ए. एफ. सी. ट्रेडिंग कंपनी दिल्लीवाले, श्रीगणेश ट्रेडिंग कंपनी, प्रकाश गुंजाळ, जोशी ट्रेडर्स, नवजीवन ट्रेडिंग कंपनी, गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी, उबेदभाई शेख, केएसबी कंपनी, केशव वाघमारे, नाना खरात, फिरोज शेख, एनजीएस कंपनी यासह मोठ्या संख्येने टोमॅटो खरेदीदार व्यापाºयांनी लिलावात सहभागी होत खरेदी केली.
बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी. शिंदे, पी. आर. जाधव, लेखापाल डी. जे. राजेभोसले, व्यवस्थापक आर. जे. डगळे, निरीक्षक एस. के. चव्हाणके, एस. ए. बाळदे, व्ही. एस. कोकाटे यांनी लिलावाचे कामकाज पाहिले. शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा असे अवाहन बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, सचिव विजय विखे व संचालक मंडळाने केले आहे.

 

Web Title: Launch of Tomato auction on the occasion of the establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार