वडांगळी उपबाजारात टमाटा लिलावाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:52+5:302021-08-19T04:18:52+5:30

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आणि सभापती लक्ष्मणराव शेळके यांच्या ...

Launch of Tomato Auction at Vadangali Sub Bazaar | वडांगळी उपबाजारात टमाटा लिलावाचा शुभारंभ

वडांगळी उपबाजारात टमाटा लिलावाचा शुभारंभ

Next

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आणि सभापती लक्ष्मणराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली टमाटा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर उपसभापती संजय खैरनार यांच्यासह संचालक उपस्थित होते.

सरपंच योगेश घोटेकर यांनी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे यांनी उपबाजारातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी सभापती कचरु डावखर, माजी उपसभापती काशिनाथ सानप, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, नवनाथ गडाख, आण्णा कांदळकर, आनंदा आढांगळे, संचालक शांताराम कोकाटे, सुधाकर शिंदे, सुनीता बोऱ्हाडे, पंढरीनाथ खैरनार, सचिव विजय विखे, उपबाजाराचे इन्चार्ज विशाल उगले आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपसभापती सोमनाथ भिसे यांनी केले. शेतकऱ्यांनी आपली कुचंबना व नुकसान टाळण्यासाठी बांधावर किंवा शिवारमापाने टमाट्यासह अन्य शेतमाल विक्री न करता आपला शेतमाल वडांगळी उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे व संचालक मंडळाने यावेळी केले.

पहिल्याच दिवशी वडांगळी परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा विक्रीसाठी आणत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. पहिल्याच दिवशी ५ हजाराहून अधिक क्रेटसची आवक झाली. टमाटा शेतमालाची खरेदी करण्यासाठी प्रभाकर हारक, अनिल हारक, ज्ञानेश्वर मुरडनर, दत्तु गडगे, प्रमोद यादव, श्रीगणेश ट्रेडींग कंपनी, बापु डांगे, अण्णा हारक, निवृत्ती चव्हाणके आदींसह अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून खरेदी केली.

चौकट-

आठवडाभर लिलाव आणि रोख पेमेंट

वडांगळी उपबाजारात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर सोमवार ते रविवार असे सलग आठवडाभर टोमॅटो शेतमालाचे लिलाव सुरू असणार आहे. याशिवाय शेतकरी बांधवांना टोमॅटोचे लिलाव झाल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात पेमेंट अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

फोटो - १८ वडांगळी टमाटा

- सिन्नर तालुक्यातील वडांगळी उपबाजारात टमाटा लिलावाचा शुभारंभ करताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत सभापती लक्ष्मणराव शेळके, संजय खैरनार, विजय विखे, सुदेश खुळे, योगेश घोटेकर यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी व शेतकरी.

180821\18nsk_40_18082021_13.jpg

फोटो - १८ वडांगळी टमाटा 

Web Title: Launch of Tomato Auction at Vadangali Sub Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.