पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो हंगामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 04:22 PM2020-08-16T16:22:50+5:302020-08-16T16:25:24+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील शंभर एकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालु वर्षेचा टोमॅटो हंगामाला सुरूवात सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आली. दर वर्षी पिंपळगाव बसवंत बाजार समिती भारताच्या विविध राज्यातून टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी दाखल होत असतात. या वर्षी देखील करोनाचे सावट असताना देखील व्यापारी वर्ग दाखल झाले असुन बाजार समितीने टोमॅटो हंगाम सुरूच राहणार असल्याचे जनजागृती करत शेतकरी वर्गाला टोमॅटो लागवडसाठी आवाहन केले होते.

Launch of Tomato Season at Pimpalgaon Baswant Bazar Samiti | पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो हंगामाचा शुभारंभ

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो हंगामाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी व व्यापारी वर्गाची आरोग्यची काळजी घेत सॅनीटायझरसाठी दोन ट्रॅक्टरची सुविधा केली आहे.

पिंपळगाव बसवंत : येथील शंभर एकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालु वर्षेचा टोमॅटो हंगामाला सुरूवात सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आली. दर वर्षी पिंपळगाव बसवंत बाजार समिती भारताच्या विविध राज्यातून टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी दाखल होत असतात. या वर्षी देखील करोनाचे सावट असताना देखील व्यापारी वर्ग दाखल झाले असुन बाजार समितीने टोमॅटो हंगाम सुरूच राहणार असल्याचे जनजागृती करत शेतकरी वर्गाला टोमॅटो लागवडसाठी आवाहन केले होते.
शेतकरी वर्गाने या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीने शेतकरी व व्यापारी वर्गाची आरोग्यची काळजी घेत सॅनीटायझरसाठी दोन ट्रॅक्टरची सुविधा केली आहे.
सध्या बाजार समतिीमध्ये तीस ते पस्तीस हजार कॅरेटची आवाक येत असुन बाजार भाव ४११ ते ५५० मिळत आहे. टोमॅटो हंगाम दरवर्षी प्रमाणेच होणार असुन शेतकरी वर्गला टोमॅटो विक्र ी झाल्यावर रोख रक्कम शेतकरी वर्गाला दिले जात असुन शेतकरी वर्गाने टोमॅटो बाजार समिती मध्येच विक्र ीसाठी आणण्याचे आवाहन सभापती बनकर यांनी दिली आहे.
यावेळी संचालक निवृती धनवटे, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, नारायण पोटे, बापु पाटील, सुभाष होळकर, उद्धव निमसे, महेंद्र शिंदे, अरूण चव्हाणके, नंदु गांगुर्डे, संजय सिरसाठ, बाळासाहेब बाजारे सह शेतकरी व्यापारी उपस्थित होते. 

Web Title: Launch of Tomato Season at Pimpalgaon Baswant Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.