देवळा येथे भूमिगत विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:03 PM2018-10-18T17:03:47+5:302018-10-18T17:03:55+5:30
नगरपंचायतीच्यावतीने पायलट प्रोजेक्ट
देवळा : मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्युत वाहिन्या भूमिगत असाव्यात यासाठी ग्रामीण भागातील पायलट प्रोजेक्ट म्हणून देवळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १९ व १२ मध्ये भूमिगत विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इंदिरानगर येथे प्रभाग क्र . ३ मध्ये दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत पाईप गटार व डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
इंदिरानगर येथे समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वच्छ व सुंदर देवळा ह्या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू असतांना शहरातील कचरा व्यवस्थापनाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे काम समाधानकारक नसल्याची नागरीकांची तक्र ार असल्यामुळे दिवाळीनंतर नवीन ठेकेदाराला कचरा व्यवस्थापनाचे काम देणार, तसेच प्रत्येक घरात ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी लवकरच दोन डस्टवीन देण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले. इंदिरा नगर येथील रहिवासी जिजाबाई अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप अहेर यांनी आभार मानले.अनिल देवरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगराध्यक्ष ज्योत्स्ना अहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक अहेर, जितेंद्र अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदिप अहेर, बाळासाहेब अहेर, शीला अहेर, केदा वाघ, रोशन अलिटकर, मुख्याधिकारी संदीप भोळे, दिलिप अहेर आदींसह महिला व नागरीक उपस्थित होते.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजना
देवळा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पर्यायी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. अहेर यांनी दिले.