सिन्नर तालुक्यात वनमहोत्सवाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:07 PM2019-07-02T18:07:28+5:302019-07-02T18:08:30+5:30
सिन्नर : राज्यात तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यात वनमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी वृक्ष लागवडीस शुभारंभ तालुक्यातील ठाणगाव येथे करण्यात आला.
तालुक्याला असलेल्या सुमारे बारा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंचायत समिती वनमहोत्सव व कृषिदिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या आवारात पंचायत समिती व तालुका कृषि विभाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. मिलींद भणगे, कृषी अधिकारी कैलास भदाणे, शामकांत पवार, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, कृषी पर्यवेक्षक संजय गोसावी आदीसह विविध खात्याचेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.