डोंगराळेत विविध कामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:01 AM2018-02-26T00:01:58+5:302018-02-26T00:01:58+5:30
तालुक्यातील डोंगराळे येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
मालेगाव : तालुक्यातील डोंगराळे येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात राष्टÑीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना, जिल्हा क्रीडा विभागामार्फत क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण कंपाऊंड, १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेसाठी ई-लर्निंग संच, १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीने दलित वस्तीत सामाजिक सभागृह दुरूस्ती व सुभोभिकरण, १४ व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीने गावासाठी आर. ओ. फिल्टर प्रणाली तसेच लोकसहभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डिजिटल रुम. या सर्व विकास कामांचा समावेश होता. याप्रसंगी सरपंच मिनाक्षी साळुंके, उपसरपंच विमलबाई बावीस्कर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक एस. बी. बच्छाव, समाधान ठोंबरे, महेंद्र ह्याळीज, प्रकाश ह्याळीज, मनोहर ठाकरे, दिगंबर परदेशी, वसंत ह्याळीज, कारभारी ह्याळीज, सुदाम खैरनार, राकेश ह्याळीज, मच्छिंद्र खैरनार, प्रमोद ह्याळीज, शंकर खैरनार, प्रदीप ह्याळीज, भाऊसाहेब ठाकरे, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी इतर मंजुर कामांची माहिती दिली. त्यात जिल्हा क्रीडा विभागांतर्गत तरुणांसाठी व्यायाम शाळा, ग्रामविकास विभागामार्फत २५/१५ योजनेंतर्गत सामाजिक सभागृह असे नवीन सर्व कामे मंजूर झालेली आहेत असे सांगितले.