मुंजवाड येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
By Admin | Published: October 29, 2014 10:16 PM2014-10-29T22:16:51+5:302014-10-29T22:17:47+5:30
वाढती लोकसंख्या : पाणीप्रश्न सुटण्याची आशा
मुंजवाड : येथे राष्ट्रीय पेयजल (भारत निर्माण) योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ एन. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, सरपंच गणेश जाधव, उपसरपंच विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
दहा वर्षापूर्वीं गावाला जल स्वराज्य योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना साकारण्यात आली होती. त्यानंतर गावाचा विस्तार वाढला. सावतानगर व इंदिरानगर परसिरासह गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असे. तसेच उन्हाळ्यात जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावत असल्याने तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी सरपंच गणेश जाधव व उपसरपंच विजय सूर्यवंशी यांनी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६१ लक्ष रु.ची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नवीन विहिर, पाण्याची टाकी येथून सावतानगर व इंदिरानगर वसाहतीत जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजनप्रसंगी माजी पोलिसपाटील तुकाराम जाधव, माजी सरपंच सुशीला जाधव, गुलाब जाधव, दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील जाधव, रमेश निकम, खंडू पिंपळसे, एन. टी. जाधव, शंकर जाधव, हरिकांत सूर्यवंशी, शंकर पगारे, माजी सरपंच नंदू जाधव, देवीदास जाधव, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे, निवृत्ती खैरनार, भिका जाधव आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)