कीर्तागळी येथे पाणीवापर संस्थेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:37 PM2020-08-24T14:37:13+5:302020-08-24T14:38:39+5:30
सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.
सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.
मागील 2 वर्षांपासून पाणी वापर संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहे.संस्थेचा वाढता कारभार लक्षात घेता संचालकांनी कार्यालय टाकण्याचा निर्णय घेतला व त्यामार्फत गावातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी बनवून पाण्याबरोबरच कृषि निविष्ठा तसेच उत्पादित शेत मालाला विक्री केंद्र पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
आज रोजी युवा मित्र संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील पोटे यांच्या हस्ते संत श्री हरिबाबा पाणी वापर संस्था कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कार्यालयासमोर वृक्षारोपण देखील करण्यात आले.तसेच पोटे यांनी शेतमाल विक्री, अटल भूजल योजना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संत श्री.हरिबाबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दगु चव्हाणके,उपाध्यक्ष गोरख चव्हाणके, सचिव .नानासाहेब चव्हाणके, युवा मित्र संस्थेचे अजित भोर, नितीन अधांगळे, प्रितम लोणारे,भालचंद्र राऊत,किरतांगली ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके, प्रभाकर चव्हाणके, रावसाहेब चव्हाणके,जेष्ठ नेते संपत तात्या चव्हाणके, दशरथ गोसावी,दत्ता चव्हाणके, नवनाथ घुले, बाळू चव्हाणके, भाऊसाहेब चव्हाणके, अमोल चव्हाणके, बाजीराव चव्हाणके, वसंत चव्हाणके, राहूल चव्हाणके, ग्रामपंचायत कर्मचारी आदिसोबत शेतकरी उपस्थित होते.