नांदगाव बाजार समितीत वजनकाट्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 04:30 PM2018-02-27T16:30:54+5:302018-02-27T16:30:54+5:30
नांदगाव - बाजार समितीच्या वजनकाट्याचा शुभारंभ सभापती तेज कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नांदगाव बाजार समितीचा स्वत:चा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती , त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
नांदगाव - बाजार समितीच्या वजनकाट्याचा शुभारंभ सभापती तेज कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नांदगाव बाजार समितीचा स्वत:चा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती , त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोध करत बेमुदत लिलाव बंद करण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली होती, अखेर संचालक मंडळ व व्यापारी वर्गात बैठक होऊन बाजार समितीचा वजन काटा ग्राह्य धरणे बाबत बैठकीत एकमत झाले. त्यानुसार मंगळवारी सदर वजनकाट्याचा शुभारंभ शेतकरी , व्यापारी व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आला. पोखरी येथील शेतकरी प्रकाश मंडलीक यांचे हस्ते फित कापून व नारळ वाढवून शुभारंभ करणेत आला. यावेळी उपसभापती पुंजाराम जाधव ,संचालक एकनाथ सदगीर , राजेंद्र देशमुख , भाऊसाहेब सदगीर ,गोरख सरोदे , भाऊसाहेब सदगीर ,रामचंद्र चव्हाण , भास्करराव कासार बाळासाहेब कवडे , भाऊसाहेब काकळीज , सचिव अमोल खैरनार आदींसह शेतकरी , व्यापारी बांधव उपस्थित होते. आज बाजार समितीमध्ये कांद्याचे २०० ट्रॅक्टर विक्र ीसाठी आले होते. पैकी ४२ ट्रॅक्टरनी बाजार समितीच्या वजनकाट्यावर वजन केले. त्यानंतर व्यापारी काट्यावर केलेल्या वजनात किरकोळ फरक आढळून आला. याप्रसंगी संचालक राजेंद्र देशमुख व बाबा साठे यांनी शेतकरी व व्यापारी यांनी सलोखा ठेवून काम करावे असे आवाहन केले.