घोटीला फास्टॅगची अंमलबजावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:55 AM2019-12-16T00:55:49+5:302019-12-16T00:56:13+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच नाशिकमार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सुदैवाने त्या प्रवाशाचा जीव वाचला.
घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच नाशिकमार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सुदैवाने त्या प्रवाशाचा जीव वाचला. यावेळी टोल प्रशासनाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने काही काळासाठी गैरसोय झाली होती. मध्यरात्रीपासून पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला होता.
टोल नाका व्यवस्थापनाकडून संबंधित प्रवाशास कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. अधिकच्या वेळेमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
यावेळी पोलीस अधीक्षक अरुं धती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, घोटी टॅपचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, उपनिरीक्षक आनंदा माळी यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शनिवार, रविवार सलग दोन दिवस शासकीय सुट्टी. त्यात भाविक, पर्यटक वर्दळ असल्याने टोल प्रशासन व वाहनधारकांमध्ये हमरीतुमरी होत होती.
देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत सर्वच वाहनांनी टोल नाक्यावर फास्टॅगद्वारेच आॅनलाइन टोल भरणे अपेक्षित आहे.
त्याची अंमलबजावणी दि. १ डिसेंबरपासून होणार होती, परंतु पूर्वतयारी अभावी आणि संभ्रमामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकलण्यात
आली होती, मात्र (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू केली.
अनेक ठिकाणी महामार्ग खड्ड्यात
मुंबई-नाशिक महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून, अनेक ठिकाणी महामार्ग खड्ड्यात गेलेला दिसून येतो. दुरु स्तीचा केवळ दिखावा ठरत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना होणाºया अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तर अनेक जण जखमी झाले असून, वाहनांचेही पाटर््स तुटत असल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.