सिनिअर्स कट्ट्याचा शुभारंभ

By admin | Published: January 3, 2017 11:06 PM2017-01-03T23:06:27+5:302017-01-03T23:06:51+5:30

अंकुश शिंदे : लासलगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ

Launches the Seaniers Katta | सिनिअर्स कट्ट्याचा शुभारंभ

सिनिअर्स कट्ट्याचा शुभारंभ

Next

लासलगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे परस्परांशी कमी होत असलेला संवाद हा मानसिक तणावाची निर्मिती करणारा आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना आपल्या भावनांचे अदान-प्रदान करण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू केलेला सिनिअर्स कट्टा महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल यात शंका नाही, असे प्रतिपादन नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी लासलगाव येथे केले.  ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्यांकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी सायंकाळी शिवकमल मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांकरिता सिनिअर कट्टाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिर्ऱ्हे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, लासलगावच्या माजी सरपंच संगीता शेजवळ, पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील, भाजपाचे प्रकाश दायमा, शिवसेनेचे विभागप्रमुख शिवा सुरासे, कॉँग्रेसचे गुणवंत होळकर, भाजपाचे राजेंद्र चाफेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुलेमान मुलाणी, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण निकम उपस्थित होते. प्रारंभी लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी प्रस्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे , सभापती जयदत्त होळकर, प्रकाश दायमा, सुलेमान मुलाणी व सुरेश पवार यांनीही भाषणात या उपक्रमाचे कौतुक  केले.  याप्रसंगी डॉ अभिजित नाकवे व डॉ. दीपा मुंदडा यांनी मधुमेह उपचार व मार्गदर्शन तसेच डॉ. पूर्वा मेहता यांनी आहारविषयक मार्गदर्शन केले. डॉ. अनिल बोराडे व डॉ. विकास चांदर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यपत्रिका देण्यात आली. लासलगाव पोलीस ठाण्याचे व लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दुपारी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. डॉ किरण निकम, अनिल ठाकरे, स्वप्नील पाटील, श्रीनिवास दायमा, विलास कांगणे, विनोद लोहाडे, मृगेश शहा व श्रीकांत आवारे यांनी तपासणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक व पोलीसपाटील मोठ्या संख्येन उपस्थित होते. (वार्ताहर)




 

Web Title: Launches the Seaniers Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.