गोदा पूजनाने स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:09 AM2018-09-21T01:09:27+5:302018-09-21T01:10:02+5:30
त्र्यंबकेश्वर : सन २०१९ मध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ गोदावरी पूजनाने करण्यात आला. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर क्रमांक येण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे-केरु रे यांनी यावेळी बोलताना केले.

कार्यक्रमप्रसंगी धनश्री क्षीरसागर यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबद्दल पालिकेने ठरविलेल्या उद्दिष्टांविषयी सांगत नमामि गोदा फाउंडेशन तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही दिली. गोदावरीचे गटारीकरण थांबावे व गोदामाई पुनश्च एकदा खळखळ वाहावी. तिला गत वैभव प्राप्त व्हावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे सांगितले. शुभारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर,आरोग्य सभापती विष्णु दोबाडे, नगरसेवक कैलास चोथे, बांधकाम सभापती दिपक गिते, सागर उजे, नगरसेवक त्रिवेणी तुंगार, अनिता बागुल, सायली शिखरे, माधवी भुजंग, मंगला आराधी, कल्पना लहांगे, पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामायणे, शितल उगले, भारती बदादे, संगीता भांगरे आदी उपस्थित होते.कार्यशाळेचे आयोजनकार्यक्र मापूर्वी पालिका कार्यालयात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस पालिका कर्मचारी, गावातील बचत गट, त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण कोळंबे, अधीक्षक श्रीमती डिंडाळकर, अधिक्षक देवरे, जिल्हा रु ग्णालयातील राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कक्षच्या श्रीमती उज्वला चंद्रकांत पाटील, प्रकाश पठाडे आदींनी मार्गदर्शन केले.