लाँड्रीचालकाने केले दहा हजार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 06:22 PM2021-04-06T18:22:31+5:302021-04-06T18:23:28+5:30

कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दहा हजार रुपये परत केले.

The laundryman returned ten thousand | लाँड्रीचालकाने केले दहा हजार परत

रमेश बोरसेंचा सन्मान करताना रमेश भोसले, ए. डी. मोरे, उद्धव सोनजे, दिलीप पगार, राजेंद्र जाधव, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकळवण : प्रामाणिकपणाबद्दल सत्कार

कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दहा हजार रुपये परत केले.

कळवण येथील ओतूर रोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून रमेश बोरसे हे लाँड्रीचा ( इस्त्री ) व्यवसाय करतात. बोरसे यांनी त्यांच्याकडे सतत इस्त्रीसाठी कपडे देणारे सेवानिवृत्त प्राचार्य ए. डी. मोरे यांच्या इस्त्रीसाठीच्या पँटच्या खिशात दहा हजार रुपयांची रोकड सापडल्याने त्यांनी ती प्रामाणिकपणे मोरे यांना परत केली.
नजरचुकीने मोरे यांच्याकडून इस्त्रीसाठी दिलेल्या एका पँटच्या खिशात सदर रक्कम राहून गेली होती. कपडे इस्त्रीला देण्यात आले असले तरी त्यात पैसे आहेत, ही बाब मोरे यांच्या लक्षात आली नाही. मात्र, कपडे इस्त्री करायला घेताच बोरसे यांना पँटच्या खिशात काहीतरी असल्याचे निदर्शनास आले. पाहतात तर खिशात चक्क दहा हजार रुपये होते ! बोरसे यांनी मोह आवरत हाती लागलेले दहा हजार मोरे यांना प्रामाणिकपणे परत केले. आजच्या या कलियुगात बोरसे यांनी दहा हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. यापूर्वीही विसपुते नामक ग्राहकाच्या खिशात असलेले चार ग्रॅम सोने त्यांनी प्रामाणिकपणे परत केले होते. प्रामाणिक माणसांच्या तुटवड्यात ही घटना अनुभवास येताच प्राचार्य मोरे यांच्या वतीने बोरसे यांचा शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश भोसले, उद्धव सोनजे, दिलीप पगार, राजेंद्र जाधव, आदी उपस्थित होते.
 

Web Title: The laundryman returned ten thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.