लॉन्सचालकांनो, चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:09+5:302020-12-12T04:31:09+5:30
इंदिरा नगरच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वी विवाह समारंभातून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असे एकूण ...
इंदिरा नगरच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वी विवाह समारंभातून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख असे एकूण अकरा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉन्स व मंगल कार्यालयांची बैठक घेत नीलेश माईनकर यांनी लॉन्ससंचालकांना खबरदारीच्या उपाययोजनांविषयी सूचना केल्या. यात प्रत्येक लॉन्स व मंगल कार्यालयचालकांनी उत्तम दर्जाचा सीसी टीव्ही बसवावा, तसेच सीसी टीव्ही यंत्रणेद्वारे नियमित रेकॉर्डिंग होते की नाही, याचीही वेळोवेळी तपासणी करावी, असा सल्ला दिला, तसेच अशा ठिकाणी कार्यरत कामगारांचे आधार कार्डची झेरॉक्स व एक छायाचित्र घेणे, दर्शनी भागात सूचना फलक लावणे, समारंभाच्या वेळी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना कराव्यात, तसेच वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे सूचना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी लॉन्सचालकांना केल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय नवले यांच्यासह लॉन्स व मंगल कार्यालयाचे चालक उपस्थित होते.
(आरफोटो-११ इंदिरानगर पोलीस)