लॉन्स, मंगल कार्यालये अनलॉक कधी होणार , व्यावसायिकंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:35+5:302021-03-07T04:14:35+5:30
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर आलेली मर्याद शहरासह परिसरातील लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांना ...
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर आलेली मर्याद शहरासह परिसरातील लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांना मारक ठरत असून लॉन्स व मंगल कार्यालये चालकांसह केटरर्स, बँड , इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, घोडा, बग्गी आदी विविध व्यवसायातील हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एकीकडे मॉल, सिनेमागृह, रेल्वे, बस अशा विविध सेवा व उद्योग पूर्ववत होत असताना विवाह सोहळ्यांवरील निर्बंध अजूनही कायम असल्याने लॉन्स, मंगल कार्यालये अनलॉक कधी होणार , असा सवाल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन लॉन्स चालकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका विवाह सोहळ्याना आमंंत्रितांना वेगवेगळ्या टप्प्याने मर्यादित संख्येत बोलाविण्याचा सल्लाही दिला जात आहे. मात्र विवाह आयोजक कुटुंबामध्ये यामुळे निराशा होत असल्याने क्षमतेच्या किमान ५० किवा ५०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. त्यासाठी लॉन्स व मंगल कार्यालय चालकांच्या संघटनांनी राज्यव्यापी मोहीम हाती घेतली असून या विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांच्या व्यथा ध्वनिचित्रमुद्रित माध्यमातून सांगितल्या जात आहे.
इन्फो-
व्यावसायिकांना मार्चपासून २५० कोटींचे नुकसान
विवाह सोहळ्यावर लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, फोटोग्राफर, डेकोरेटर्स , इव्हेंट मॅनेजमेंट, बँड पथक, किराणा आदी विविध व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र २८ मार्च २०२० पासून टाळेबंदीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून या व्यावसायिकांना ११ महिन्यात तब्बल २५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कोट-१
लॉन्स चालकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे. पण आता सर्वच व्यावसाय पूर्वपदावर येत असताना क्षमतेच्या किमान ५० टक्के अथवा ५०० पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्याची परवानगी मिळावी अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. उपस्थितीच्या निर्बंधांमुळे लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांसोबतच केटरर्स, बँड , इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, घोडा, बग्गीकेटरर्स, बँड , इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, घोडा, शेती व्यावसायालाही मोठा फटका बसत आहे.
-सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालय संघटना
कोट-२
रेल्वे, बस, मॉल, थिएटर सुरू केले आहेत. या ठिकाणी हजारो लोक एकत्र येत असताना नियमांचे व पालनही होत नाही. असे असताना केवळ विवाह सोहळ्यांवरच निर्बंध का? तुलनेत लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा असल्याने फिजिकल डिस्टन्स व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होऊ शकते. त्यामुळे लॉन्स मंगल कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने विवाह सोहळ्यांना परवानगी देण्याची गरज आहे.
- समाधान जेजूरकर, सह सचिव लॉन्स व मंगल कार्यालय संघटना
कोट-
लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे. परंतु, अन्य व्यावसायाप्रमाणे लॉन्स व मंगल कार्यालयांना उपलब्ध जागेनुसार ५० टक्के उपस्थितीसह सोहळो आयोजनाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. या व्यवसायावर किराणा, फुल विक्रेते ब्युटीपार्लर, मेहंदी असे अनेक व्यवसायातील रोजगार अवलंबून आहे. या रोज त्यामुळे सूचना करूनही आयोजकांकडून नियमांचे पालन होत नसेल तर व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये.
- शंकरराव पिंगळे, सचिव लॉन्स व मंगल कार्यालय संघटना
===Photopath===
060321\06nsk_36_06032021_13.jpg~060321\06nsk_37_06032021_13.jpg~060321\06nsk_38_06032021_13.jpg
===Caption===
सुनील चोपडासमाधान जेजूरकरशंकरराव पिंगळे~सुनील चोपडासमाधान जेजूरकरशंकरराव पिंगळे~सुनील चोपडासमाधान जेजूरकरशंकरराव पिंगळे