वकील परिषदेचा आज समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:44 AM2020-02-16T01:44:33+5:302020-02-16T01:44:49+5:30
महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेचा रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेचा रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. या परिषदेसाठी राज्यातील सुमारे चार हजारांहून अधिक वकिलांनी हजेरी लावलेली आहे. रविवारी दुपारी खुले चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी तीन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप करण्यात येईल.
आज इमारतीचे भूमिपूजन
जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयासाठी अतिरिक्त जागेची मागणी होती. गतवर्षी ही मागणी पूर्ण होऊन न्यायालयाला जागा मिळाली. राज्य शासनाने १७१ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर अखेर या इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला आहे.