लालसेना : निधी नसल्याने राज्यभर छेडले आंदोलन साठे महामंडळ कार्यालयाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:21 AM2018-03-02T02:21:08+5:302018-03-02T02:21:08+5:30
नाशिक : राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाला पुरेसा निधी मिळत नसल्याने या कार्यालयाकडून आर्थिक विकासाचे कोणतेही प्रकरणे मंजूर होत नाही.
नाशिक : राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाला पुरेसा निधी मिळत नसल्याने या कार्यालयाकडून आर्थिक विकासाचे कोणतेही प्रकरणे मंजूर होत नाही. त्यामुळे या कार्यालयाचा उपयोग शून्य झाल्याचा आरोप करीत गुरुवारी लालसेना या संघटनेच्या वतीने शहरातील अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. या संदर्भात लालसेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी अण्णा भाऊ साठे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. परंतु या महामंडळाकडे निधीचा सतत तुटवडा असल्यामुळे समाजातील होतकरू तरुणांना आणि बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर होत नाहीत. महामंडळासाठी पुरेसा निधी आणि कर्ज प्रकरणे नसल्यामुळे कर्मचाºयांनादेखील काहीच काम शिल्लक राहिलेले नाही. राज्यातील इतर प्रकल्पांना राज्यशासन निधी उपलब्ध करून देत असताना महामंडळाला मात्र निधी दिला जात नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कोणताही उपयोगच राहिला नसल्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संदीप कांबळेदेखील उपस्थित होते.