वाहतुकीच्या शिथिलतेने मदतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:57 PM2020-04-26T23:57:42+5:302020-04-26T23:58:12+5:30
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.
नाशिक : लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही देवस्थान ट्रस्ट आणि शेतकरी मदतीला धाऊन आल्याने निराधारा बालकांचे आश्रम चालविणाºया संस्थांना दिलासा मिळाला.
निराधार बालकांचे संगोपन करणाºया आश्रमशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी दैनंदिन नियोजन करावे लागते. किंबहूना अशाप्रकाच्या नियोजनानुसार बालकांचे पालणपोषण होत असते. आश्रमाला मिळणारी मदत, अन्नधान्य, दानशुरांचे सहकार्य आणि कुणी अन्नदान करण्यावर दैनंदिन नियोजन केले जाते. परंतु लॉकडाउनच्या काळात नियोजित अन्नदानाचे कार्यक्रम रद्द झाले तर नियमित मिळणारी मदतही वाहतुकीची साधने नसल्याने बंद झाली होती. आश्रमामध्ये असणारा साठाही संपुष्टात येऊ लागल्याने मुलांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शहर परिसर तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर असलेल्या अनेक अनाथालयामध्ये काहींनी स्वयंस्फूर्तीने अन्नाचे पाकिटे दिली त्यावरही काही दिवस उपजिविका सुरू होती. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला तशी गैरसोय होऊ लागल्याने काही सामाजिक संस्था आणि देवस्थान ट्रस्टच्या मदतीचे दोन वेळच्या जेवणाची मुलांची सोय झाली. लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता आल्यानंतर आता बºयापैकी आश्रमशाळांचा प्रश्न मिटला आहे.
शासनाचे अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांना फारशी अडचण आली नसली तरी केवळ नागरिकांच्या मदतीवर चालणाºया संस्थांपुढे काही दिवस मोठा पेच निर्माण झाला होता. लॉकडाउन वाढला आणि अधिक कठोर झाला तर अडचण कायम राहणार आहे. परंतु येथील मुलांच्या संगोपनाचे नियोजन हे दात्यांच्या मदतीवरच अवलंबून असते. शासनाने लॉकडाउनचा विचार करून अशा संस्थांनादेखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु याची माहितीच संबंधित संस्थांना माहिती नाही. संस्थांचे ज्यांच्याशी संपर्क आहे अशा ठिकाणाहून मदत येते.
शेतमालाला भाव नसल्याने मालाची विल्हेवाट लावण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी अनाथाश्रमात जाऊन त्यांना भाजीपाला पुरविला. भाव नसल्याने अनेकदा शेतकरी शेतमाल फेकून देतात. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता कुणाच्या मुखात अन्न जाणे महत्त्वाचे असल्याने शेतकºयांनी अशा आश्रमांना आवर्जून शेतमाल पुरविला.