दोन दुचाकीसह लाखो रु पयांचा ऐवज लंपास कळवण : सेना पदाधिकाऱ्यालाही फटका; पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 AM2018-04-18T00:09:01+5:302018-04-18T00:09:01+5:30
कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला.
कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला. धाडसी घरफोडी झाल्याने नागरिक भयभयीत झाले असून, या घरफोड्यांचा पोलिसांनी तपास लावून कळवणकर जनतेला दिलासा द्यावा व पोलिसांची शहरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणी कळवणकर जनतेने केली आहे. कळवण शहरातील नामदेव रघुनाथ लहारे हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या शहरातील शिवाजीनगर भागातील महालक्ष्मी कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील २० हजाराचे लॅपटॉप, ७० हजारांची रोकड, १५ हजारांची सोन्याची अंगठी, हजाराचे कडे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्याबरोबर त्याच रात्री शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ व विलास निंबा पाटील यांच्या दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही दुचाकी या हॅण्डल लॉक असताना चोरीस गेल्या आहेत. याबाबत कळवण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधोर करीत आहेत.
शहरातील शिवाजीनगर परिसरात नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने बहुतांशी नोकरदार बाहेरगावी गेले असल्याने शहरातील उपनगरातील अनेक घरे बंदच आहेत, याचा फायदा घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा कळवण शहराकडे वळविला आहे. टेहळणी करून बंद घरांचे दरवाजे फोडून यशस्वी घरफोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. भरदिवसा घरफोड्या होत असल्याने शहरातील नागरिक भयभयीत झाले असून, मागील वर्षी झालेल्या घरफोडींच्या तपासात कळवण पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असताना पुन्हा घरफोडी सत्र सुरू झाल्याने नागरिक भयभयीत झाले आहेत. त्यामुळे कळवण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांनी केली आहे.