लक्ष्मण पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:01 AM2018-06-07T01:01:52+5:302018-06-07T01:01:52+5:30
मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले.
मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते ११ वर्षं संचालक व व्हाइस चेअरमन होते. जिल्हा मजूर फेडरेशनचे ते संस्थापक चेअरमन तसेच १५ वर्षं संचालक होते. मालेगाव पालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नगरपालिकेत आरोग्य सभापती म्हणूनही काम पाहिले. त्यांनी श्रीरामनगर, लक्ष्मण (लक्ष्मी) वाडी, साने गुरुजीनगर वसवण्यात पुढाकार घेतला होता. झोपडपट्टी बसायत सभेचे ते अध्यक्ष होते. अखेरपर्यंत ते राष्ट्र सेवा दल, जनता दलाचे निष्ठावान नेते, कार्यकर्ते राहिले. अनेक सामाजिक उपक्रमांशी तसेच संस्था व मंडळांशीही ते निगडित राहिले. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तसेच मामको बँकेचे विद्यमान संचालक राजेंद्र भोसले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.