आर्थिक निकषांवर आरक्षणासासाठी नेतृत्व करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:19+5:302021-06-22T04:11:19+5:30
नाशिक : मराठा आरक्षणाच्या लढ्याला मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस यांनी पाठिंबा देतानाच खासदार संभाजी राजे ...
नाशिक : मराठा आरक्षणाच्या लढ्याला मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस यांनी पाठिंबा देतानाच खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आर्थिक निकषांनुसार आरक्षणासाठी नेतृत्व करावे, असे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे.
नाशिक शहरात मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला सोमवारी (दि. २१) उपस्थित राहून निलिमा पवार यांनी संभाजी राजे यांना निवेदन दिले. मराठा समाजातील आर्थिक सधन घटकाला आरक्षणाची गरज नसल्याचे नमूद करतानाच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आर्थिक निकषांनुसार आरक्षण मिळण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी या निवेदनातून व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार अशा समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करीत समाजातील सर्वच घटनांना न्याय दिला. हाच वारसा छत्रपती शाहू महाराजांनीही पुढे चालवत समाजातील सर्व घटकांतील नागरिकांना समान संधी मिळावी यासाठी आरक्षणाची पायाभरणी केली. आता त्यांचा वापसा पुढे नेत खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आरक्षणाचा लढा देताना समाजातील विविध घटकांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी आर्थिक निकषांनुसार आरक्षणाच्या मागणीसाठी नेतृत्व करण्याची मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान, मविप्र नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शिक्षण संस्था असल्याने निलिमा पवार यांनी केलेल्या आवाहनाला संभाजी राजे काय प्रतिसाद देणार, याकडे आता शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळासह मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे.
===Photopath===
210621\21nsk_43_21062021_13.jpg
===Caption===
खासदार संभाजी राजे छत्रपती यांना निवेदन देताना मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार,समवेत संचालक सचीन पिंगळे, नाना महाले आदी.