तळागाळातील सर्वसामान्यांचा नेता : भूषण कासलीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:57+5:302021-07-07T04:16:57+5:30

चांदवड (महेश गुजराथी) : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व जनतेला काहीतरी नवीन करून दाखवायचं आणि निस्वार्थपणे सेवा द्यायची ...

Leader of the grassroots: Bhushan Kasliwal | तळागाळातील सर्वसामान्यांचा नेता : भूषण कासलीवाल

तळागाळातील सर्वसामान्यांचा नेता : भूषण कासलीवाल

googlenewsNext

चांदवड (महेश गुजराथी) : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व जनतेला काहीतरी नवीन करून दाखवायचं आणि निस्वार्थपणे सेवा द्यायची हा उद्देश ठेवून मी प्रथम नगराध्यक्ष झाल्यानंतर शहरासाठी पन्नास वर्षांच्या पुढील व्हिजन ठेवून शहराला चोवीस तास व सातही दिवस मिळेल अशी पाणीपुरवठा राज्य शासनाच्या मदतीने मंजूर करून आणल्याचे चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अभिमानाने सांगितले.

चांदवड म्हटलं की आई श्री. रेणुका देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीची आठवण येते. अहिल्याबाई होळकरांचा रंगमहाल व ऐतिहासिक वारसा, श्री. चंद्रेश्वर भगवंताची जुने मंदिर, गणेश मंदिर, बुखारी बाबा दर्गा, शनी मंदिर, अशा एक-ना अनेक नावांनी ओळख असलेलं चांदवड. मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेल्या शहराची ओळख ही खूपच आगळीवेगळी आहे. सातमाळेच्या निसर्गरम्य डोंगररांगेत वसलेलं हे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व नजरेतील गाव म्हणजे चांदवड हे खूप काही सांगून जाते. नाशिक जिल्ह्यात आपले नाव लौकिक व्हावे यासाठी प्रत्येक जण कळत-नकळत आपापल्या परीने लहान मोठे कार्य करत असतो, यामध्ये जवळून बघितलं तर अनेक जण शहराच्या गावाच्या विकासासाठी धडपड व हातभार लावत असतात.

यात राजकीय क्षेत्रात नाव घ्यायचं म्हटलं तर कोणाचे ? असा प्रश्न पडतो. परंतु अशातच कोणीतरी हिरा असा मिळतो की त्यांच्या अनेक अशा विकास कामांनी त्यांचं नाव लौकिक होतं. अशीच ही एक छोटीसी यशोगाथा भूषण कासलीवाल यांची आहे. माजी आमदार स्व. जयचंदजी दीपचंद कासलीवाल यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व जनतेला काहीतरी नवीन करून दाखवायचं या उद्देशाने त्यांनी स्वत:ला कामांमध्ये गुंतविले आहे. अनेक लोकप्रतिनिधी विविध कामे करून आपली नावे लौकिक करतात. आजच्या काळामध्ये गल्ली ते दिल्ली असे पडसाद उमटून येतात. असेच हे कासलीवाल घराणे होय. जयचंद कासलीवाल यांनी आपल्या कार्यकाळात मध्ये ४४ गाव पाणीपुरवठा आणून महत्त्वपूर्ण कामगिरी करत आजही थेंब-थेंब पाण्याची उणीव जी भासवत होती, तिची आठवण येऊ नये म्हणून यांनी ाआमरण उपोषण करून चांदवड शहराची नव्हे तर ४४ गावांसोबत ७२ गावांना पाणीपुरवठा होत आहे.

शहराच्य आगामी वाटचालीबाबत बोलताना भूषण कासलवीवाल म्हणतात, शहराचा चेहरा-मोहरा नक्कीच बदलेल. जवळपास दोनशे तीस कोटींहून अधिक कामे शहरात आणली असून, याबरोबर विविध रस्ते, भुयारी गटार, उच्च दाब व लघु दाब विद्युत वाहिनी, सांडपाणी नियोजन, घनकचरा नियोजन, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू व्यक्तींना घरे उपलब्ध करून दिली आहेत.

----------------------

कर्मचाऱ्यांचे वाढविले मनोबल

कोरोना काळात देखील प्रत्यक्षात आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पेशंटला भेटून त्या व्यक्तीला बेड, मेडिसिन, दवाखाने, ऑक्सिजन, आर्सेनिक अल्बम ३०,आयुर्वेदिक काढा, मास्क, हे शहरात तालुक्यात व मतदार संघात उपलब्ध करून दिले. प्रशासनाचे व कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढविण्यासाठी सन्मान केला. यामध्ये मोलाचे सहकार्य केल्याचे कासलीवाल सांगतात.

--------------------------------

चांदवडचे नाव देशात पाेहोचविणार

यावेळी भूषण कासलीवाल यांनी बोलताना सांगितले की, २०२५ किंवा पुढील भविष्यात येणारे नगर परिषद यासाठी मी यापूर्वीच एक भूतो-ना-भविष्य असे विजन अधोरेखित करून ठेवले आहे. त्यासाठी लागणारे सर्व यंत्रणा सज्ज आहे. चांदवड शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून असे पाऊल उचलेल की यामध्ये चांदवड नगर परिषदेची नक्कीच आर्थिक परिस्थिती बलाढ्य होईल. शहरातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गांपर्यंत सर्वांना आपली बाजारपेठ खुली होईल. ज्यामध्ये प्रत्येक वस्तूची, प्रत्येक घटकाची खरेदी- विक्री होईल कमीत कमी एक हजाराहून अधिक परिवाराला रोजगार उपलब्ध होईल. चांदवडचे नाव हे राज्यात नव्हे तर देशात जाईल असा मी निश्चिय करून ठेवला आहे. यामुळे सर्व जनतेला नक्कीच फायदा होईल व यातून शहराचा विकासदेखील होईल, असा मला विश्वास असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.

Web Title: Leader of the grassroots: Bhushan Kasliwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.