नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:16 AM2023-02-12T10:16:21+5:302023-02-12T10:17:21+5:30

‘महाविजय २०२४’चा भाजपचा निर्धार

Leaders have become, now bring the activists to the party, the appeal of state president Bawankule | नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन

नेते झाले, आता कार्यकर्ते पक्षात आणा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दमदार कामगिरी करीत असून लोकसभेच्या ४५ जागा आणि विधानसभेच्या किमान १५० जागांचे टार्गेट समोर ठेवून आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन करीत भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या  प्रदेश कार्यकारिणी बैठकीत जोश भरला. नेते झाले आता महाविकास आघाडीतील सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात आणा, असे आवाहन त्यांनी पक्षजनांना केले.

कोणत्या नेत्यांना आणखी आणायचे ते आम्ही पाहू, तुम्ही एकेका कार्यकर्त्याला जोडा. महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कार्यकर्ता हवालदिल झाला आहे, त्याला भाजपमध्ये आणा असे म्हणत बावनकुळे यांनी यापुढे इतर पक्षांतील नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यावर जोर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. महाविजय २०२४ अभियानाद्वारे   प्रचंड विजयाचा निर्धार  प्रदेश कार्यकारिणीने केला.

पूर्णवेळ विस्तारक नेमणार
राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे २८८ विस्तारक २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नेमण्यात येतील, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.

श्रीकांत भारतीय अभियान प्रमुख
nलोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या किमान १५० जागा भाजप-शिंदे यांना जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. 
nत्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान राबविले जाणार असून त्याचे  प्रमुख म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांना नेमण्यात आले आहे. 
nतसे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भारतीय यांना कार्यकारिणी बैठकीत दिले.

शिवसेनेची व्होटबँक अन् गरिबांना जोडण्याची योजना
शिवसेनेची विशेषत: मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक परिसरातील परंपरागत व्होटबँक कशी तोडायची याची योजना भाजप आखणार आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा मतदार राहिलेल्या गरिबातील गरीब लोकांना भाजपशी जोडले जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांद्वारे साद घातली जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले. २०१४ मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला २८ टक्के, शिवसेनेला १९, काँग्रेसला १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मते मिळाली. हिंदुत्वाची जी मते बाळासाहेबांमुळे मिळत होती ती उद्धव यांच्या ध्येयधोरणांमुळे हलायला लागली ती भाजपकडे वळविणे हे पक्षाचे मुख्य ध्येय आहे. लोकसभेला ४५ आणि विधानसभेला २०० जागांचे लक्ष्य गाठायचे असल्याचेही तावडे म्हणाले.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रख्यात विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रिया बेर्डे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करून काही काळ कामदेखील केले होते. मात्र, शनिवारी त्यांनी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत अचानकपणे भाजपात प्रवेश केला. त्याशिवाय भिवंडीच्या काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजप प्रवेशाची संधी साधली. दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नाशिक शहर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘मविआ’ची अवस्था होईल शिवसेनेसारखी ! - महाजन
राज्यात अजूनही उलथापालथ सुरूच असून काँग्रेस पक्षात तर उघडपणे दोन गट पडले आहेत. मविआचेदेखील तीन-तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत कोण कुठल्या पक्षातून बाहेर पडून भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात येतील, त्याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे ‘मविआ’ची अवस्थादेखील शिवसेनेसारखी होईल, असा दावा भाजपचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपने कधीही सुडाचे राजकारण केले नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Leaders have become, now bring the activists to the party, the appeal of state president Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.