सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

By admin | Published: February 11, 2017 11:45 PM2017-02-11T23:45:44+5:302017-02-11T23:46:07+5:30

सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

Leading front row strength | सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

Next

सटाणा : येथील पालिकेत गेल्या डिसेंबर महिन्यात शहर विकास आघाडीने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आघाडीचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सरू केले असून, आज अपक्ष नगरसेवक त्यांना जाऊन मिळाल्याने आघाडीची संख्या आता आठवरून नऊवर गेली आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग सहामधून अपक्ष निवडून आलेल्या संगीता संदीप देवरे यांनी आज शहर विकास आघाडीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून त्यांची आघाडीच्या गटात नोंदणी करण्यात आली. देवरे आघाडीत सहभागी झाल्याने त्यांचे नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे, नगरसेवक बाळा बागुल, डॉ. विद्या सोनवणे, भारती सूर्यवंशी यांनी सत्कार करून स्वागत केले. प्रभाग क्रमांक आठमधून निवडून आलेल्या सुवर्णा नंदाळे यांनी कायदेशीर प्रक्रि या राबवून आघाडीचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने अध्यक्षपदासह आघाडीचे संख्याबळ आठवर गेले. आज पुन्हा आघाडीचे संख्याबळ आठवर असताना त्यांना देवरे जाऊन मिळाल्याने आघाडीचे संख्याबळ नऊवर गेले आहे.
२००१ च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर यंदा दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना अक्षरश: चारीमुंड्या चित केले होते; मात्र नगरसेवकपदावर एकूण एकवीस जागांपैकी अवघ्या सहा जागा आघाडीला मिळाल्या होत्या. त्यामुळे पालिकेत त्रिशंकू परिस्थिती होती. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार संजय चव्हाण यांनी आघाडीकडे प्रस्ताव सादर केला होता.

Web Title: Leading front row strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.