कॉँग्रेसच्या हाती आघाडीची चावी

By admin | Published: January 22, 2017 12:44 AM2017-01-22T00:44:11+5:302017-01-22T00:44:30+5:30

राष्ट्रवादी अगतिक : तडजोड करण्याची भूमिका

The leading key in the hands of the Congress | कॉँग्रेसच्या हाती आघाडीची चावी

कॉँग्रेसच्या हाती आघाडीची चावी

Next

नाशिक : भ्रष्टाचार-गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने घड्याळ्याची टिकटिक हृदयाचे ठोके वाढवत असताना महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसच्या टेकूने पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आघाडी करण्यास राष्ट्रवादी अगतिक बनली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेससोबत आघाडी करण्यास आम्ही उत्सुक असून, त्यासाठी एक पाऊल नेहमीच पुढे राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आघाडीची चावी कॉँग्रेसच्या हाती असल्याने घडाळ्याचे काटे उलटे फिरवायचे की सुलटे, याचा उलगडा येत्या काही दिवसांत कॉँग्रेसकडून होणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, कॉँग्रेसमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असल्याने आघाडीचे घोंगडे भिजत पडले आहे. आघाडी करण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय नाही अन्यथा पक्षाचे आहे ते अस्तित्व नामशेष होण्याची भीती राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उभय स्तरावर चर्चा सुरू आहे. परंतु, कॉँग्रेसने आघाडीबाबत संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत राष्ट्रवादीची धडधड वाढविली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार जयंत जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, कॉँग्रेससह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे. पक्षाचे दरवाजे त्यासाठी खुले असून, पक्ष एक पाऊल पुढेच असणार आहे. शिवसेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणे गरजेचे आहे.
पक्षाची भावना ही तोडायची नसून जोडायची आहे. कॉँग्रेससोबत झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर एकमत होऊ शकलेले नाही. पॅनलनुसार निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार रिंगणात उतरविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून त्याबाबत बारकाईने विचार होण्याची गरज असल्याचेही जाधव व ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: The leading key in the hands of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.