पाझर तलाव, नदी, नाले कोरडी ठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:22 PM2019-08-01T15:22:34+5:302019-08-01T15:23:50+5:30
खर्डे : खर्डेसह परिसरात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे मोठे पाझर तलाव व नदी नाले कोरडी ठाक असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले असतांनाही खर्डे व परिसरात दमदार पाऊस पडला नाही . यामुळे पाणी टंचाईचे संकट मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे .
खर्डे : खर्डेसह परिसरात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने छोटे मोठे पाझर तलाव व नदी नाले कोरडी ठाक असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले असतांनाही खर्डे व परिसरात दमदार पाऊस पडला नाही . यामुळे पाणी टंचाईचे संकट मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच आहे . मध्यंतरी झालेल्या पेरणीयुक्त पावसामुळे या परिसरात पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे . तर दुसरीकडे मजुर वर्गाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . खर्डेसह ,कणकापूर ,शेरी ,वार्शी , मुलूकवाडी ,कांचणे व हनुमंतपाडा या ठिकाणी समाधानकारक पाउस नसल्याने नदी ,नाले व छोटी मोठी पाझर तलाव कोरडी ठाक पडली आहेत . खर्डे गावाला वार्शी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उद्धभव विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे .मात्र धरणात फक्त मृत साठा शिल्लक असून त्याचाही अवैध उपसा होत असल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठाच्या विहिरीवर झाल्याने त्या लगतची विहीर अधिग्रहित करण्यात येऊन चार पाच दिवसाआड खर्डे गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे . तोही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे .यामुळे धरण उशाशी कोरड घशाशी अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून , परिसरात पाण्याचे संकट दूर होण्यासाठी मुसळधार पाऊस पडण्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत . हा परिसर तसा डोंगर पायथ्याशी असतांना दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे येथील नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने याठिकाणी नवीन सिंचन प्रकल्प होणे आवश्यक आहे .