पाटावरील मुख्य जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:41 PM2019-05-29T23:41:15+5:302019-05-30T00:16:09+5:30

गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 Leakage of main water channel of pata | पाटावरील मुख्य जलवाहिनीला गळती

पाटावरील मुख्य जलवाहिनीला गळती

Next

गंगापूर : गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथील महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लिक करून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत आहे. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.
परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नसल्याने दोन वर्षांत येथे महापालिकेचे लाखो लिटर पाणी वाया जाऊन काही प्रमाणात त्याची चोरीही गेल्याचे समजते.
जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईने हाहाकार माजलेला असताना गंगापूर गावातील या धरणातून आलेल्या थेट पाइपलाइनला मध्ये ब्रेक केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. ज्याप्रमाणे महापालिका अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते, तशी दंडात्मक कारवाई आता महापालिकेच्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर करणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत. पाणीटंचाईचे रौद्ररूप तालुका व जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करून दिसून येते.
शहरी भागासाठी आमदारांना पाण्यासाठी आंदोलनाने करून भांडावे लागत असताना पाण्याची व्यवस्था राखणाºया अधिकाºयांकडून मात्र त्याचे दुर्लक्ष होताना दिसते. काही ठिकाणी दहा दहा दिवस पाणी येत नाही, तर काही ठिकाणी महिन्यातून दोनदा पाणी मिळत असतानाही मात्र मनपाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पाण्याच्या मुख्य वाहिनीला त्वरित दुरु स्त करून महापालिकेचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अधिकाºयांशी संपर्क साधूनही दुर्लक्ष  काही राजकीय पुढारी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन नियोजन करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखोली, तर पाणी वाया गेल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती होत आहे. नागरिकांनी माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता चव्हाणके यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते रजेवर असल्याचे समजले, त्यांनी त्यांच्या कनिष्ठ अधिकारी संदीप नलावडे यांचा दूरध्वनी क्रमांक देऊन दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाण्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून याठिकाणी वाहने घसरून पडत आहेत़
गंगापूर गावातील उजव्या पाटावरील महापालिकेच्या थेट मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गंगापूर धरणाचे लाखो लिटर पाणी वाया गेले, आतातरी महापालिकेने सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असताना येथे पाणी वाया जाणे योग्य नसून ही गळती महापालिकेने त्वरित थांबवून वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचवावे.
- बाळासाहेब लांबे, अध्यक्ष,
सोमेश्वर मंदिर संस्थान

Web Title:  Leakage of main water channel of pata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.