ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:04 PM2019-05-12T22:04:06+5:302019-05-12T22:05:20+5:30

चांदवड : तालुक्यातील सुमारे ७२ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाºया ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली असून, यामुळे चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली असता सदर बाब उघड झाली आहे.

Leakage of the Ozarkhed dam's pipeline | ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला गळती

चांदवड तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून आडगावजवळ गळती झाल्याचे दिसत आहे.

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई : चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; पाहणी करून शिष्टमंडळाने केल्या सूचना

चांदवड : तालुक्यातील सुमारे ७२ गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाºया ओझरखेड धरणाच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली असून, यामुळे चांदवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली असता सदर बाब उघड झाली आहे.
ओझरखेड धरणावरून गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी अनियमित येत असल्याने चांदवड तालुक्यासह चांदवड शहराला पिण्याचा पाणी- पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शहरात गेल्या १८ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी वरचेगावातील शिंपी गल्लीतील महिला व नागरिकांनी चांदवड नगर परिषदेच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते.
या पार्श्वभूमीवर चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नगरसेवक जगन्नाथ राऊत, संदीप उगले, अल्ताफ तांबोळी, राजकुमार संकलेचा, विलास पवार, पप्पू भालेराव, कांतिलाल बाफना, गुड्डू खैरनार, गणेश खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने ओझरखेडपर्यंत असलेल्या जुन्या पाइपलाइनची पाहणी केली.
ओझरखेड धरणावरून चांदवड शहरासाठी स्वंतत्र पाइपलाइन व योजना लवकरच सुरूहोईल; मात्र तोपर्यंत जुन्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत असताना येणाºया पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गळती आहे. ही गळती काढण्यासाठी या योजनेतील महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे दोनच कर्मचारी एवढ्या मोठ्या पाइपलाइनवर काम करतात. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले.
या गळतीत आडगाव येथील मराठी शाळेच्यामागे पाइपलाइन फुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता. तसेच शेलू वडगावमधील असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या पाच महिन्यांपासून
मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे.
सदर आजूबाजूच्या शेतकºयांची पाण्याची व्यवस्था करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेलू व माथ्यावरची शेलू या दरम्यानदेखील व्हॉल्व्हशेजारी विहीर खोदून त्यावरचे पाणी पूर्ण विहिरीत घेतले जाते. परिणामी शहरांमध्ये येणारे पाणी हे कमी दाबाने येते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तत्काळ लिकेज काढण्यात यावे. नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे मत व्यक्त होत आहे. यामुळे पाणीपुरवठा चांदवड शहरापर्यंत होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
या पाहणीप्रसंगी बाळासाहेब शेळके, अंकुर कासलीवाल, पराग कासलीवाल, सुनील बागुल, सुनील डुंगरवाल, भटूसा वाणी, बाळा पाडवी, सुरेश जाधव, नितीन फंगाळ, महेश खंदारे, गणेश हांडगे, रत्नदीप बच्छाव, गंगाधर सोनवणे, रवि बडोदे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सत्यवान गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.वारंवार तक्रार करूनही दखल नाहीखंडित वीजपुरवठा व ठिकठिकाणी गळती होणे, पाइपलाइनमधून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने तालुक्याला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ओेझरखेड धरणात मुबलक पाणी असूनही जनतेला वेळेवर व नियमित पाणी मिळत नसल्याने चांदवड शहरातील नागरिकांना १८ दिवसांपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. चांदवड शहरातील पाण्याची टाकी न भरल्याने येथील स्वच्छ पिण्याचे पाणी एटीएम मशीनही गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची बाब ही पाहणी दौºयात उपस्थित पत्रकार, नागरिकांच्या लक्षात आली.

Web Title: Leakage of the Ozarkhed dam's pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.