जलवाहिनीला पंधरवड्यापासून गळती; पाण्याचा अपव्यय
By admin | Published: May 7, 2017 06:25 PM2017-05-07T18:25:00+5:302017-05-07T18:25:00+5:30
येथील पेठरोडवरील फुलेनगर झोपडपट्टीमधून जाणाऱ्या जलवाहिनीला मागील पंधरा दिवसांपासून गळती
नाशिक : येथील पेठरोडवरील फुलेनगर झोपडपट्टीमधून जाणाऱ्या जलवाहिनीला मागील पंधरा दिवसांपासून गळती लागल्याने पाण्याचा कारंजा आकाशात उडत होता. या कारंजाचे तूषार अंगावर झेलत परिसरातील बाळगोपाळांनी मजा लूटत उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला.
सदर जलवाहिनी जुनाट झाली असून गंज चढल्याने गळती लागल्याचे बोलले जात आहे; मात्र परिसरातील काही टवाळखोरांनीदेखील जलवाहिनी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. महानगरपालिक ा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असून पंधरा दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागूनदेखील अद्याप या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. एक ीकडे पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या प्रशासनाकडून दुसरीकडे जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यास अपयश येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलवाहिनीची त्वरित दुरूस्ती करून भर उन्हाळ्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.