दसकच्या सीएनजी गॅस पंपावर गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:39+5:302021-08-12T04:18:39+5:30

मंगळवारी (दि. १०) सकाळी दहा वाजेच्या सुमारास सीएनजी गॅस टँकरमधून पंपावर गॅस भरला जात होता. त्या वेळी अचानकपणे गॅस ...

Leaks on CNG gas pumps for decades | दसकच्या सीएनजी गॅस पंपावर गळती

दसकच्या सीएनजी गॅस पंपावर गळती

googlenewsNext

मंगळवारी (दि. १०) सकाळी दहा वाजेच्या सुमारास सीएनजी गॅस टँकरमधून पंपावर गॅस भरला जात होता. त्या वेळी अचानकपणे गॅस पंपाचा रिफिलिंग कनेक्टर पाइप नादुरुस्त होऊन गॅसची गळती सुरू झाली. हा प्रकार पंप ऑपरेटर अण्णासाहेब भाबड यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने रिफिलिंग कनेक्टरचा मुख्य पुरवठा करणारी कळ (कॉक) बंद केली. तसेच इमर्जन्सी स्टॉपर बंद केल्याने पुरवठा थांबला.

या प्रकाराबाबत एमएनजीएलच्या कंट्रोल रूमला कळविले असता तत्काळ तेथील अधिकाऱ्यांनी रिफिलिंग कनेक्टर पाइप घेऊन पंपावर पाठविलेले तंत्रज्ञ दत्तात्रय शिरसाठ यांनी रिफिलिंग कनेक्टरचा पाइप जोडून साएनजी गॅस पंप पूर्ववत सुरू केल्याचे आढाव पेट्रोल पंपाचे संचालक मुकुंद आढाव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांमध्ये एकच गोंधळ उडाल्याने पळापळ झाली होती. सुदैवाने भाबड यांनी प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टळल्याची भावना पेट्रोल पंपावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. आढाव यांनी भाबड यांच्या कर्तव्यतत्परतेचे कौतुक केले.

Web Title: Leaks on CNG gas pumps for decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.