माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:13 AM2018-03-28T00:13:29+5:302018-03-28T00:13:29+5:30

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Learn to recognize a man: Tulsiram Gatta | माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

Next

नायगाव : स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सहचिटणीस हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, संचालक हेमंत नाईक, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, विलास सांगळे, निवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.  सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जलसंधारण, पाणी अडावा, पाणी जिरवा व नगर विक साचे नियोजनच निसर्गाचा समतोल राखण्यास यशस्वी मूलमंत्र असल्याचे सांगून ग्रामविकास समितीने हाती घेतलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.  सिन्नरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना माणसे जोडण्याची किमया साधून सार्वजनिक हिताच्या केलेल्या कामाचे आज संपूर्ण तालुका फळे चाखत असून, झाडे लावणाऱ्या दिघोळे यांना विसरून चालणार नसल्याचे सांगत असताना दिघोळेंचा संपूर्ण जीवनपट सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, लक्ष्मणराव सांगळे, हेमंत धात्रक आदींची भाषणे झाली.  यावेळी ग्रामविकास समितीचे अशोक बोडके, जयराम गिते, अंकुश गिते, सोमनाथ बोडके, संदीप नागरे, रामचंद्र कापसे, नामदेव कापसे, सीताराम बोडके आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रास्ताविक तर रामदास ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.
उगवत्या सूर्याला....
ज्या सूर्याच्या सावलीचाही आपल्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी नमस्कार करणारे, तोच सूर्य मात्र मावळतीला जात असताना त्याला विसरणारी संस्कृती आज बघायला मिळत आहे. आज झालेल्या माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या जीवनगौरव समारंभास निमंत्रण देऊनही तालुक्यातील एकही राजकीय पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने हा विषय नायगाव खोºयात चर्चेचा बनला आहे.

Web Title: Learn to recognize a man: Tulsiram Gatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक