कौशल्य तपासून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:17 PM2018-12-15T16:17:22+5:302018-12-15T16:17:46+5:30

विनोद तावडे : असीमा शैक्षणिक केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन

Learn the skills of the students to make life! | कौशल्य तपासून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवा!

कौशल्य तपासून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवा!

Next
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य विकासच्या धर्तीवर सुविधा व शिक्षण उपलब्ध करून दिल्यानेही समाधान व्यक्त

इगतपुरी : असीमा या संस्थेने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला प्रेरक आहेत. या कौशल्य शिक्षण व आधुनिक सोयी-सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात प्रगतिच्या दिशेने गरु डझेप घेतील असा विश्वास व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे कौशल्य तपासून त्यांचे आयुष्य घडविण्याचे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या प्रामुख्याने, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या आवळखेड येथे आदिवासी बालकांच्या विकासासाठी असीमा बाल शैक्षणिक केंद्राच्या नवीन अद्यावत इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी तावडे बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील श्याम जाजू, महसूल आयुक्त राजाराम माने, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव, डॉ. वैशाली झनकर ,नगराध्यक्ष संजय इंदुलकर, गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षण अधिकारी नरेंद्र खंदारे, असीमा ट्रस्टच्या चेअरमन श्रीमती दिलबर पारख, माजी आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शाम जाजू, विश्वस्त पॉल, श्रीमती दिलबर पारख यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रांत अधिकारी राहुल पाटील. तहसीलदार वंदना खरमाळे, शांतीलाल चांडक, सुनील बच्छाव, प्रदीप ढोबळे यांचेसह विश्वस्त श्रीमती नीला कपाडिया, प्रीति कुंडालिया, शर्वरी कुलकर्णी, पुनीत चांडक, ऋ षिका आनारे, गीता सुभेदार ,किरण फलटणकर, राजेश जैन ,बबन कदम, जे के मानवेढे आदि उपस्थित होते.
इन्फो
संस्थेबद्दल गौरवोद्गार
विनोद तावडे म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे जिकिरीचे काम असतांनाही हे आव्हानात्मक काम स्वीकारून ग्रामीण व दुर्गम क्षेत्रात आधुनिक सुविधा निर्माण करून देऊन शिक्षण क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकल्याने असीमा ट्रस्ट कौतुकास पात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य विकासच्या धर्तीवर सुविधा व शिक्षण उपलब्ध करून दिल्यानेही त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

Web Title: Learn the skills of the students to make life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.