वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 10:46 PM2020-03-12T22:46:23+5:302020-03-12T22:52:52+5:30
देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क

संतांनी आपल्याला जगायला आणि वागायला शिकवले. म्हणून तरुण हा आपल्या कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अर्थात समाजाचा कर्णधार आहे. त्यांचे पाऊल चुकीच्या दिशेने न भरकटता संतांनी दाखविलेल्या मार्गाने गेले पाहिजे, असे आवाहन निरंजन आळंदीकर महाराज यांनी केले. गेली सात दिवस सुरू असलेल्या संगीत भागवत कथा, तुकाराम बीज, शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.
येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित सोहळ्यात देवगावकर न्हावून निघाले होते. संगीत भागवत कथेला वाढत जाणारी गर्दी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सकाळी गावातून गाथा मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात व पुष्प वर्षाव करीत तरुणांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच महाप्रसादाने कार्यक्र मांची सांगता झाली.
सोहळा यशस्वीतेसाठी आयोजक चंद्रभागा बोचरे, प्रल्हाद बोचरे, रामदास बोचरे, बाळू साबळे, गणपत बोचरे, दत्तू बोचरे, आदींनी परिश्रम घेतले.आई-वडिलांची नियमित सेवा करा देव मंदिरात नाही तर आपल्या घरातच आहे. आई-वडिलांमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, त्यांची नियमित सेवा करा तसेच कुणाची निंदा करीत बसण्यापेक्षा भगवंताचे नामस्मरण करा. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. तसेच जो दुसऱ्याला सुख देतो, त्यालाच सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे सर्वांनी चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल, असा सल्ला निरंजन आळंदीकर महाराजांनी उपस्थितांना दिला.