ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:11 PM2020-02-01T23:11:48+5:302020-02-02T00:13:33+5:30

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे. त्यामुळे येथे नव्याने पंचवार्षिक ...

Leaving reservation of Gram Panchayats | ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

googlenewsNext
ठळक मुद्देसिन्नर । निवडणुकीचा बिगुल वाजल्याने तयारीला वेग

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे. त्यामुळे येथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये ३ व ४ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समिती आणि तहसीलच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि. ३ आणि ४ फेब्रुवारीदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीस विशेष ग्रामसभेच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. ३ फेब्रुवारीला ५४, तर ४ फेब्रुवारीला ४६ गावांच्या विशेष ग्रामसभा होणार आहेत. ग्रामस्थांना या विशेष ग्रामसभेची तीन ते चार दिवस अगोदर माहिती व्हावी, या उद्देशाने ग्रामसेवकांनी या आरक्षण सोडतीचे स्थळ, वेळ, दिनांक याबाबत दर्शनीय भागात प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत असल्याने पुढच्या सहा महिन्यांत तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. एकाचवेळी १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण पडणार आहे.

या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका
तालुक्यातील आडवाडी, बोरखिंड, बारागावपिंप्री, भोकणी, लक्ष्मणपूर, भरतपूर (विघ्नवाडी), चंद्रपूर, खापराळे, चापडगाव, चास, दहीवाडी, महाजनपूर, दापूर, देवपूर, धोंडवीरनगर, हिवरगाव, जामगाव, जामगाव, कुंदेवाडी-मजरे, कुंदेवाडी मौजे, कनकोरी, खंबाळे, मेंढी, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, पांगरे बुद्रुक, पिंपळे, पंचाळे, कहांडळवाडी (शिवाजीनगर), सोनांबे, वावी, वडगाव-सिन्नर, हरसुले, जयप्रकाशनगर, सोनारी, धारणगाव, धुळवड, घोरवड, हिवरे, मुसळगाव, मानोरी, निमगाव-सिन्नर, पास्ते, पांगरी खुर्द, पुतळेवाडी (रामपूर), सोमठाणे, सुळेवाडी (सुंदरपूर), सावता माळी नगर, श्रीरामपूर (शिंदेवाडी), यशवंतनगर (पिंपरवाडी), निमगाव-देवपूर, घोटेवाडी (आशापुरी), दोडी बुद्रुक, दातली, केदारपूर, शहापूर, सोनवाडी, सुरेगाव, सरदवाडी, विंचूर दळवी, वडांगळी, पाथरे खुर्द, धोंडबार, आटकवडे, औढेवाडी, चिंचोली, दोडी खुर्द, फुलेनगर (माळवाडी), गोंदे, जोगलटेंभी, कोळगाव माळ, खडांगळी, मलढोण, रामनगर, सांगवी, वडझिरे, मिठसागरे, डुबेरे, फर्दापूर, गुळवंच, कोमलवाडी, कोनांबे, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, मीरगाव, माळेगाव, मापारवाडी, नायगाव, नळवाडी, फत्तेपूर, निºहाळे, पाटोळे, पिंपळगाव, पाडळी, पाथरे बुद्रुक, शिवडे, सोनगिरी, आगासखिंड, ब्राह्मणवाडे, शिवाजीनगर (दापूर), वारेगाव, बेलू या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Leaving reservation of Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.