महिला सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 04:44 PM2021-02-04T16:44:39+5:302021-02-04T16:45:00+5:30
दिंडोरी : तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदांसाठी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी दिली.
Next
ठळक मुद्दे १२१पैकी १०४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव
दिंडोरी : तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदांसाठी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी महिला सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चितीबाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांनुसार दिंडोरी तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत बैठक आयोजित केलेली आहे. तालुक्यातील एकूण १२१पैकी १०४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.