सरपंच सोडत अन् सातवी पासच्या अटीमुळे अनेकांची "कोंडी"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 05:54 PM2020-12-27T17:54:26+5:302020-12-27T17:54:48+5:30
अभोणा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्जांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा विविध राजकिय पक्षांचे नेते, ...
अभोणा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्जांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा विविध राजकिय पक्षांचे नेते, पदाधिकारी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सरकारच्या नविन नियमांमुळे ''मेकर ''च्या भूमिकेतून स्वमर्जीतील उमेदवारांच्या माध्यमातून गावगाड्यात हुकूमत ठेवणाऱ्या नेते मंडळींच्या नाकीनऊ आले आहे.
आधिच सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर केली आहे. त्यातच आता, निवडणुकीतील उमेदवारांना ७ वी पास असण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गावपातळीवर पॅनल प्रमुखांची चांगलीच कोंडी होतांना दिसत आहे.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच निवडीचा २०१७ चा आदेश रद्द करत शासनाने सुधारणा करून सदस्यांमधून सरपंच निवडून आणण्यासाठीची अधिसूचना लागू केली आहे. यातून जुलै २०१७ च्या आदेशात सरपंच ऎवजी सदस्य असा शब्द बदलून देण्यात आला आहे. दरम्यान,या शासन निर्णयाची प्रत मिळविण्यासाठीही इच्छूकांची धावपळ सुरु असल्याचे दिसते आहे.
.