विद्या भारतीतर्फे गीतेवर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:19+5:302020-12-27T04:11:19+5:30

व्याख्यानात गीतेतील एका श्लोकावर व्याख्यान देण्यात आले. सुशीलकुमार पांडे अध्यक्षस्थानी होते. संचालिका अल्का प्रमोद, शीतल खुराणा यांची प्रमुख उपस्थिती ...

Lecture on Geeta by Vidya Bharati | विद्या भारतीतर्फे गीतेवर व्याख्यान

विद्या भारतीतर्फे गीतेवर व्याख्यान

Next

व्याख्यानात गीतेतील एका श्लोकावर व्याख्यान देण्यात आले. सुशीलकुमार पांडे अध्यक्षस्थानी होते. संचालिका अल्का प्रमोद, शीतल खुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानात संस्थेचे २३ पदाधिकारी व देशभरातून मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सुबोधकुमार मिश्र, स्वप्निल कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

जेसीआय अध्यक्षपदी आनंद भागवत

नाशिकरोड : येथील जेसीआयच्या अध्यक्षपदी आनंद भागवत, तर सचिवपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नांदूर नाका येथील एका हॉटेलमध्ये जेसीआयची सर्वसाधारण सभा संतोष बोथरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी २०२१ या वर्षासाठी नाशिकरोड जेसीआय अध्यक्ष आनंद भागवत, सचिव निलेश शिंदे, उपाध्यक्ष पवन मुंदडा, हेमंत कोल्हे, नितीन कुलकर्णी, मोहन सानप, भूषण केला, विकी जाजू, गौरव विसपुते, रूपेश चांडक, योगेश खैरनार यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. सर्वसाधारण सभेला संस्थापक अध्यक्ष दिलीप मेढे, मयूर करवा, मुकेश चांडक, राकेश लोया, दिनेश करवा, भरत निमसे आदी उपस्थित होते. यावेळी नवीन सदस्यांचा शपथविधी झाला. निवडणुक अधिकारी म्हणून श्रीकांत कटाळे यांनी काम पाहिले. ( फोटो २६ आनंद भागवत , निलेश शिंदे)

लायन्स क्लबतर्फे रक्तदान शिबिर

नाशिकरोड : लायन्स क्लब ऑफ देवळाली नाशिकरोडच्या वतीने देवळालीगावातील दंडे हनुमान मंदिरात नेत्ररोग व सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद‌्घाटन नगरसेविका सत्यभामा गाडेकर, लायन्सच्या अध्यक्ष विजया गारे यांच्या हस्ते झाले. डॉ. अभिजित रामोळे, डॉ. जयदीप राजेबहादूर यांनी नागरिकांची नेत्र तपासणी व इतर आजारांची तपासणी केली. रुग्णांना औषधे वाटप करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. संजय पगारे, गौतम पगारे, योगेश गाडेकर, नितीन दाणी आदी उपस्थित होते.

Web Title: Lecture on Geeta by Vidya Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.